Home क्राईम यशवंत नगरातून चारचाकी वाहनाची चोरी

यशवंत नगरातून चारचाकी वाहनाची चोरी

0
120


जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यशवंत नगरातून एकाची चारचाकी वाहन घरासमोरून अज्ञात व्यक्तीने चोरून नेल्याची घटना उघडकीला आली आहे. याबाबत रामानंद पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली आहे.

 

पोलीस सुत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, सुनिल लक्ष्मण इंगळे (वय-५२) रा. यशवंत नगर, जळगाव हे आपल्या परिवारासह राहतात. नोकरी करून आपला उदरनिर्वाह करतात. शासकीय नोकरीच्या ठिकाणी त्यांनी त्यांची टाटा सुमो गोल्ड चारचाकी वाहन क्रमांक (एमएच ४६ एएक्स १३५१) ही त्यांनी त्यांच्या घरासमोर १३ जुलै रोजी सायकाळी ६ वाजता पार्किंग करून लावलेली होती. त्यानंतर मध्यरात्री अज्ञात चोरट्यांनी २ लाख २५ हजार रूपये किंमतीची चारचाकी वाहन चोरून नेल्याचे गुरूवार १४ जुलै रोजी उघडकीला आले. त्यांनी परिसरात सर्वत्र शोधाशोध केली परंतू वाहन कुठेही मिळाले नाही. अखेर दुपारी ४ वाजता रामानंदनगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांच्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक जितेंद्र तावडे करीत आहे.


Protected Content

Play sound