जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील नशीराबाद येथे शेतात वीजेचा धक्का लागून मृत्यू झाल्याच्या घटनेला जबाबदार धरुन नागरिकांनी शेतकऱ्याला मारहाण केल्याची घटना घडली आहे, याप्रकरणी नशीराबाद पोलीस ठाण्यात २५ जणांविरोधाात गुन्हा दाखल झाला आहे.
जळगाव तालुक्यातील नशीराबाद येथे सोपान विठोबा वाणी हे वास्तव्यास आहेत. ते दिलीप शांताराम कुलकर्णी यांची नफ्याने शेती करतात, या शेतात तारेचा कुंपन घालण्यात आल आहे, या कुंपनाला स्पर्श होवून एका सफाई कर्मचाऱ्याचा विजेच्या धक्क्याने मृत्यू झाला या कारणावरुन नशीराबाद गावातील २० ते २५ जणांनी सोपान विठोबा वाणी यांना मारहाण केली, यात काठीने केलेल्या मारहाणीत सोपान वाणी यांच्या पायाला दुखापत झाली आहे, या प्रकरणी सोपान वाणी यांच्या तक्रारीवरुन मारहाण करणाऱ्या २५ जणांविरोधात नशीराबाद पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल अतुल महाजन हे करीत आहेत.