यावल-भुसावळ मार्गावर अज्ञात वाहनाच्या धडकेत हरिण ठार

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | यावल येथील यावल भुसावळ मार्गावर पहेलवान यांच्या ढाब्या जवळ अज्ञात वाहनाच्या धडकेत हरिणचा दुदैवी मृत्यु झाल्याची घटनासमोर आली असुन , वन विभागास काही सामाजिक कार्यकर्त्यांनी संपर्क साधुन माहीती दिल्यावर वनविभागाचे कर्मचारी घटनास्थळी पहोचल्याचे वृत्त आहे . या संदर्भात मिळालेली माहिती अशी की यावल भुसावळ मार्गावरील अंजाळे गावाजवळ असलेल्या पहेलवान याच्या ढाब्याजवळ रात्रीच्या वेळीस कुणीतरी अज्ञात वाहनाने हरिण या प्राणीला धडक दिल्याने तिचा जागीच मृत्यु झाल्याची घटनासमोर आली आहे.

या घटनेची माहीती महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे राज्य उपाध्यक्ष चेतन आढळकर व परिसरातील नागरिकांना मिळताच त्यांनी तात्काळ यावलचे वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे यांना दिल्यावरून वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्नील फटांगरे हे आपल्या वन विभागाच्या पथकासह तात्काळ त्या घटनास्थळी धाव घेत त्यामरण पावलेल्या हरिणला ताब्यात घेतले आहे. उद्या शासकीय नियमानुसार त्या मरण पावलेले हरिणचा अंत्यविधी करण्यात येणार असल्याची माहिती वनपरिक्षेत्र अधिकारी स्वप्निल फटांगरे यांनी दिली .

Protected Content