दारू पिऊन पतीकडून पत्नीला मारहाण

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । धरणगाव तालुक्यातील बांभोरी गावात दारू पिऊन पत्नीला शिवीगाळ व मारहाण करणाऱ्या पतीविरोधात बुधवारी १५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

धरणगाव पोलीसांनी दिलेली माहिती अशी की, संदीप दगडू भदाणे रा. बांभोरी बुद्रुक ता.धरणगाव हा तरूण पत्नी रंजनाबाई आणि आई प्रमिलाबाई यांच्यासोबत वास्तव्याला आहे. संदीप भदाणे  हा १४ मार्च रोजी दारू पिऊन घरी येवून पत्नी रंजनाबाई यांना शिवीगाळ केली. तसेच घराच्या ओट्यावर आलेले लाकूड पत्नीच्या डोक्यात मारले. या मारहाणीत त्या गंभीर जखमी झाल्या. बुधवार १५ मार्च रोजी दुपारी ३ वाजता त्यांनी धरणगाव पोलीस ठाण्यात धाव घेवून पतीविरोधात तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून पती संदीप दगडू भदाणे याच्या विरोधात धरणगाव पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ खुशाल पाटील करीत आहे.

Protected Content