शेतात बांधकाम करणाऱ्याला एकाकडून मारहाण

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील भोकरी शिवारात शेतात किरकोळ कारणावरून एका बांधकाम करणाऱ्याला शिवीगाळ करून मारहाण केल्याची घटना मंगळवारी १५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता घडली. याप्रकरणी जळगाव तालुका पोलीस ठाण्यात एकावर अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, सलीम खान नबी खान (वय-५५) रा. पिंप्राळा हुडको जळगाव हे आपल्या परिवारासह वास्तव्याला असून बांधकाम मिस्तरी म्हणून काम करतात. मंगळवार १५ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता जळगाव तालुक्यातील भोकरी शिवारातील राजू अग्रवाल यांच्या शेतात बांधकामा ठिकाणी पत्रा फिटींग करण्याचे काम सुरू होते. त्यावेळी राजू अग्रवाल यांचा चालक कैलास पाटील रा. एस.के. आईल मील, जळगाव हा तिथे आला. त्यानंतर किरकोळ कारणावरून सलीम खान यांना कैलास पाटील याने शिवीगाळ करून चापटाबुक्क्यांनी बेदम मारहाण केली. यात पोटाला व छातीला जबर दुखापत केली. याप्रकरणी बुधवारी १६ ऑगस्ट रोजी रात्री उशीरा कैलास पाटील याच्या विरोधात जळगाव तालुका पोलीसात अदखलपात्र गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ ईश्वर लोखंडे करीत आहे.

Protected Content