उपोषणकर्त्यांची प्रकृती खालावली : सावखेडेकरांचे आंदोलन

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील सावखेडासीम येथील शेखर पाटील यांनी ग्रामपंचायतीच्या चौकशीसाठी सुरू केलेल्या उपोषणाकडे प्रशासनाने दुर्लक्ष केल्याने आज त्यांची प्रकृती खालावली आहे.

यावल पंचायत समिती समोर आमरण उपोषणाकडे पंचायत समितीच्या प्रशासनाने १५ ऑगस्ट या स्वातंत्रदिना निमित्त देखील उपोषणास कडे दुर्लक्ष करीत पाठ फिरवल्याने पंचायत समितीच्या उदासीन व भोंगळ कारभारामुळे आज उपोषणाच्या चौथ्या दिवसी तालुक्यातील शेकडो महिला व पदाधिकारी ,ग्रामस्थांनी उपोषणा ठीकाणी उपस्थित राहुन संतप्त प्रतिक्रीया व्यक्त करीत आंदोनल केले. यावेळी यावल तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले आहे.

तालुक्यातील सावखेडासिम येथील ग्रामपंचायतीस सन २०२० पासून आलेल्या विविध निधी अंतर्गत आलेली अनियमिता व अपहार केल्याच्या गेल्या दहा महिन्यात वेळो वेळी तक्रारी करून ही त्या संदर्भातील अद्याप पर्यंत चौकशी होत नसल्याने येथील पंचायत समितीचे माजी गटनेते शेखर पाटील व त्यांच्या सोबत सावखेडासिम गावाचे ग्रामस्थांनी दिनांक १४ ऑगस्ट पासून यावल पंचायत समिती समोर आपले आमरण उपोषणास सुरू केले आहे.

या प्रकरणातील दोषी ग्रामसेवकावर निलंबनाची आणी ग्रामपंचायतच्या अपहार संबधीतांवर गुन्हे दाखल झाल्या शिवाय माघार नाही असा पवित्रा शेखर पाटील यांनी घेतला आहे. उपोषणास्थळी आमदार शिरीष चौधरी,राष्ट्रवादी कॉंग्रेस पक्षाच्या नेत्या रोहिणी खडसे खेवलकर यांनी भेट दिली व कारवाई होण्या संदर्भात लक्ष घातले असुन आज उपोषणाचा चौथा दिवस आहे.

यावल तालुक्यातील,सावखेडासिम येथील ग्रामपंचायतीस आलेल्या वेगवेगळ्या निधीचा अनियमित उपयोग तसेच निधीचा अपहार करण्यात आल्याची तक्रार पंचायत समितीचे कॉंग्रेसचे माजी गटनेते शेखर पाटील यांनी येथील गटविकास अधिकारी यांचे कडे १४ ऑगस्ट पासून ग्रामस्थांसह मागण्या मान्य होईस्तोवर उपोषण सुरू राहणार असल्याचे त्यांनी म्हटले असुन आज चौथा दिवस असुन ,काही उपोषणकर्त्याची प्रकृती खालवली असुन उपोषणाच्या ठीकाणी यावल ग्रामीण रूग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ प्रशांत जावळे यांनी भेट देवुन उपोषणकर्त्यांची आरोग्यची तपासणी केली. तर आज ग्रामस्थांनी आंदोलन करून तहसीलदारांना कारवाईबाबत निवेदन दिले.

शेखर पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणास सावखेडासिम ग्रामपंचायत च्या सदस्य सौ वर्षा अजय पाटील , नसीमा तडवी,रहीमान तडवी, सलीम तडवी,विनायक पाटील, शाहरूख तडवी,निखिल पाटील, समीर जुम्मा तडवी,दगेखा तडवी, भिकारी तडवी यांनी ही उपोषणात सहभाग घेतला आहे.

Protected Content