जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील श्रध्दा कॉलनीत राहणाऱ्या वृध्दाच्या घरातून अज्ञात व्यक्तीने ६८ हजार ३०० रूपये किंमतीचे चांदीच्या वस्तू आणि घड्याळ असा मुद्देमाल चोरून नेल्याची घटना २८ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या सुमारास उघडकीला आले आहे. याप्रकरणी चौकशीअंती अखेर सोमवारी ६ मे रोजी दुपारी १ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, प्रफुल्ल बळीराम कांडलकर वय ६१ रा. श्रध्दा कॉलनी, जळगाव हे आपल्या कुटुंबासह वास्तव्याला आहे. २१ माचर्श् रोजी सायंकाळी ६ ते २८ मार्च रोजी सकाळी ७ वाजेच्या दरम्यान, अज्ञात चोरट्याने त्यांच्या घरातून ६८ हजार ३०० रूपये किंमतीचे चांदीचे वस्तू आणि घड्याळ असा मुद्देमाल चोरून नेला. घरातून वस्तू चोरून नेल्याचे लक्षात आल्यानंतर कांडलकर यांनी घरात सर्वत्र वस्तूंचा शोध घेतला परंतू कोणतीही माहिती मिळाली नाही. अखेर त्यांनी सोमवारी ६ मे रोजी दुपारी १ वाजता रामानंद नगर पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून अज्ञात चोरट्यांविरोधात पोलीसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक सुशिल चौधरी हे करीत आहे.