मुंबई – लाइव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा । स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं शेतकऱ्यांनी दिवसा 10 तास वीज द्यावी या मागणीसाठी सरकारला प्रस्ताव दिला होता. या प्रस्तावावर अभ्यास करण्यासाठी उर्जामंत्री नितीन राऊत यांनी ८ तज्ज्ञांची समिती नियुक्त केली आहे.
‘राज्यातील शेतकऱ्यांना शेतीपंपास दिवसा १० तास वीज मिळावी.’ या मागणीसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेनं कोल्हापुरात आंदोलन केलं होतं. हे आंदोलन सुरु असताना राज्य सरकार स्वाभिमानीचे प्रमुख राजू शेट्टी यांच्यात बैठक झाली होती. यामध्ये येत्या १५ दिवसात निर्णय घेणार असल्याचे आश्वासन उर्जमंत्री नितीन राऊत यांनी दिले आहे.
दरम्यान, स्वाभिमानी शेतकरी संघटनेच्यावतीने दिलेल्या प्रस्तावावर अभ्यास करण्यासाठी उर्जामंत्री नितीन राऊत यांनी तज्ज्ञ समिती नियुक्त केली आहे. या तज्ञ समितीचे अध्यक्ष महावितरणचे वितरणचे संचालक असून 8 लोकांची समिती गठीत करण्यात आली आहे. शेतीसाठी दिवसा दहा तास वीज द्या, वीज बिलाची अन्यायी वसुली थांबवा, वाढीव बिलाची दुरुस्ती करा इत्यादी मागण्यांसाठी स्वाभिमानी शेतकरी संघटनेने कोल्हापूरच्या महावितरण कार्यालयासमोर आंदोलन सरु होते. अखेर त्याची दखल राज्य शासनाने घेतली आहे.