सातगावात विद्यार्थ्यांचे औक्षण करून परीक्षा हॉलमध्ये प्रवेश

पाचोरा लाइव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील सातगाव (डोंगरी) येथील पोस्ट बेसिक माध्यमिक विद्यालय आश्रमशाळेत कोरोनाचे नियम पाळून दहावीच्या विद्यार्थ्यांचे औक्षण करून परीक्षा हॉलमध्ये प्रवेश देण्यात आला.

गेल्या दोन वर्षापासून कोरोना महामारीमुळे देशासह महाराष्ट्रात शाळा बंद होत्या. त्यामुळे अनेक विद्यार्थी शाळाबाह्य झाल्याचे चित्र निर्माण झाले होते. त्यांना पुन्हा शाळेच्या प्रवाहात आणण्यासाठी शाळेतील शिक्षकांनी प्रयत्न केले. गेल्या दोन वर्षापासून परीक्षा हा विषयच नव्हता. मात्र कोरोना ओसरल्याने शासनाने ज्या शाळेत दहावीचा वर्ग असेल त्याच शाळेत दहावीची परीक्षा घेण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

यावर्षी कसेबसे तीन ते चार महिने शाळा सुरू होत्या आणि या तीन-चार महिन्याच्या शिकण्यावर विद्यार्थ्यांना २५ टक्के अभ्यासक्रम वघळून उर्वरित ७५ टक्के अभ्यासक्रमावर परीक्षा देण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. सूचनेनुसार बोर्डाच्या परीक्षा सुरू झाल्या.

कमी दिवस शाळा असल्याने आणि अभ्यासक्रम जास्त असल्याने विद्यार्थ्यांच्या मनामध्ये भीती निर्माण होती. विद्यार्थ्यांच्या मनातील भीती कशी दूर होईल. तसेच विद्यार्थ्यांचं मन प्रसन्न होऊन त्यांचं मनोबल कसं वाढेल. याच हेतूने या विद्यालयाचे मुख्याध्यापक उत्तमराव मनगटे (पाटील) यांनी याच शाळेतील अधिक्षिका शुभांगी पाटील यांच्या हस्ते परीक्षा हॉलमध्ये प्रवेश होण्यापूर्वी विद्यार्थ्यी- विद्यार्थिनींचे औक्षण करून पूजन करण्यात आले.

यावेळी विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद ओसंडून वाहत होता. या उपक्रमाचे संस्थेचे चेअरमन संजय वाघ, व्हा.चेअरमन विलास जोशी, मानद सचिव देशमुख, स्थानिक चेअरमन प्रा. भागवत महालपूरे, मुख्याध्यापक राहुल पाटील यांनी स्वागत केले आहे. यावेळी शिक्षक डी. आर. पाटील, सुनील बच्चे, फिरोज खाटीक, संदेश पवार, आकाश महालपुरे, ओमप्रकाश शेंडे, इमाम तडवी, सतीश पाटील, सखाराम चव्हाण उपस्थित होते.

Protected Content