पोलिसांचा स्तुत्य उपक्रम, गुन्ह्यांमध्ये हस्तगत केलेला मुद्देमाल तक्रारदारांना परत

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  जळगाव जिल्ह्यातील दाखल गुन्ह्यांमध्ये चोरीला गेलेले आणि गहाळ झालेले मोबाईल एकुण ११५ मोबाईल, दोन चोरीच्या दुचाकी आणि चेनस्नॅचिंगमध्ये गेलेली सोन्याचे चैन असा सर्व मुद्देमाल जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांच्याहस्ते तक्रारदार व मालकांना पोलीस मुख्यालयातील मंगलम हॉल येथे शुक्रवारी २८ जुलै रोजी सकाळी ११ वाजता देण्यात आला.

 

जळगाव जिल्हा पोलीस दलाच्या वतीने जिल्ह्यातील वेगवेगळ्या भागातून मोबाईल चोरी, दुचाकी आणि मंगळसुत्र लांबविल्याच्या घटना घडल्या होत्या. वारंवार होत असलेले मोबाईल चोरीसह इतर गुन्ह्यातील संशयितांचा शोध लावण्याचे निर्देश जिल्हा पोलीस अधिक्षक एम राजकुमार यांनी दिले होते. त्यानुसार जिल्हा पोलीस दल, स्थानिक गुन्हे शाख आणि संबंधित पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी यांनी कारवाई करत गुन्ह्यांचा उलगडा केला. यातून काही संशयितांना अटक देखील करण्यात आलेली आहे. पोलीसांच्या कारवाईत एकुण ११५ मोबाईल, चोरीला गेलेल्या २ दुचाकी आणि महिला वकीलाच लांबविलेली सोन्याचे चैन या गुन्ह्याचा  छडा लावला होता. दरम्यान, न्यायालयाच्या आदेशानुसार तक्रारदार आणि मुळ मालक यांना संबंधित मुद्देमाल देण्याचा कार्यक्रम पोलीस मुख्यालयात मंगलम हॉल येथे शुक्रवारी २८ जुलै रोजी घेण्यात आला. याप्रसंगी जिल्हा पोलीस अधिक्षक एम. राजकुमार यांच्याहस्ते देण्यात आला. याप्रसंगी  अपर पोलीस अधिक्षक चंद्रकांत गवळी आणि स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक किसन नजन पाटील आदी उपस्थित होते.

Protected Content