मुंबई-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे नेते आणि ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह दोघांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. लोकमान्य टिळक मार्ग पोलिसांनी खंडणी, मारहाण व कट रचल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सोन्याच्या दागिन्यांचे व्यापारी शैलेश जैन (५५) यांच्या तक्रारीनंतर वैभव ठक्कर व अविनाश जाधव यांच्याविरोधात भादंवि कलम ३८५, १४३, १४७, ३२३, १२० ब अंतर्गत पोलिसांनी गुन्हा दाखल केला. अविनाश जाधव यांच्या विरोधात गुन्हा दाखल झाल्याच्या वृत्ताला अप्पर पोलीस आयुक्त अभिनव देशमुख यांनी दुजोरा दिलाय. तसंच याप्रकरणी क्रॉस केस घेण्यात आली असून पुढील तपास सुरू असल्याचंही सांगण्यात आलं आहे.सराफाकडे पाच कोटी रुपयांची खंडणी मागितल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे. अविनाथ जाधव यांचे मित्र वैभव ठक्कर यांना हिशोबासाठी सराफाने बोलावले असतना, अविनाश जाधव यांनी तिथे सराफाच्या मुलाला मारहाण केली. तसेच जाधव यांनी उचलून नेण्याची व नुकसान करण्याची धमकी देऊन जैन यांना पाच कोटी रुपयांसाठी धमकावल्याचा आरोप तक्रारीत करण्यात आला आहे.
मनसेच्या नेत्यावर खंडणी व मारहाणीचा गुन्हा दाखल
8 months ago
No Comments