फैजपूर ता. यावल प्रतिनिधी । शहरातील पिंपरूळ फाट्याजवळ चोरीची वाळू वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टर चालकाने व त्यांच्यासोबत असलेल्या एकाने महसूल कर्मचाऱ्याशी हुज्जत घालून सरकारी कामात अडथळा निर्माण केल्याप्रकरणी फैजपूर पोलीस ठाण्यात दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फैजपूर ते भुसावळ रोडवर असलेल्या पिंपरूळ फाट्याजवळ आणि फैजापूर शहरातील एका भागात शुक्रवार १७ डिसेंबर रेाजी रात्री १ वाजेच्या सुमारास ट्रॅक्टर (क्रमांक एमएच १९ एपी ८५६२) वरील चालक किरण भोई रा. फैजपूर ता. यावल हा विनापरवाना वाळूची चोरटी वाहतूक करत असताना तलाठी यांनी रंगेहात पकडले होते. यासंदर्भात ट्रॅक्टर फैजपूर येथील स्टेशनला घेऊन जाण्याच्या सांगितले असता त्याचा सहकारी (पूर्ण नाव माहीत) नाही हा (एमएच १९ डीएफ ४८४३) वर दुचाकीवर घेऊन ट्रॅक्टर पळवून नेऊन प्रसार झाले. यासंदर्भात दहिगाव सजा येथील तलाठी विलास भिकाजी नागरे (वय-३८) रा. यावल यांच्या फिर्यादीवरून शुक्रवारी १७ डिसेंबर रोजी सायंकाळी ६ वाजता फैजपूर पोलीस ठाण्यात ट्रॅक्टर चालक आणि एक अनोळखी दुचाकीधारक यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.