भीषण अपघातात तरूणाच्या मृत्यूप्रकरणी डंपर चालकावर गुन्हा दाखल

जळगाव लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नशिराबाद येथील राणे हॉटेल समोर भरधाव डंपर ने दिलेल्या धडकेत दुचाकीवरील तरुणाचा मृत्यू झाला होता तर इतर दोन जण जखमी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी शनिवारी १७ मे रोजी रात्री १०.३० वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात अज्ञात डंपरचालका विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी कीख्, जळगाव तालुक्यातील नशिराबाद येथे राहणारा तेजस सुनील बिऱ्हाडे हा तरुण त्याचा भाऊ तुषार सुनील बिऱ्हाडे आणि त्याचा मित्र अजय अफलातून सपकाळे यांच्यासोबत १५ मे रोजी दुपारी दोन वाजेच्या सुमारास नशिराबादकडून जळगावकडे दुचाकी क्रमांक (एमएच १९ इएच ७११८) ने येत असताना समोरून भरधाव वेगाने येणाऱ्या डंपर क्रमांक (एमएच ०८ एपी ०७३५) ने त्यांच्या दुचाकीला जोरदार धडक दिली. त्यांनी दिलेल्या धडकेत तेजस बिऱ्हाडे याचा जागीची मृत्यू झाला होता तर त्यांचा भाऊ सुनिल बिऱ्हाडे आणि मित्र अजय सपकाळे गंभीर जखमी झाले. ही घटना घडल्यानंतर डंपर चालक डंपर रस्त्यावर सोडून पसार झाला होता. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात शनिवारी १७ मे रोजी रात्री १०.३० वाजता नशिराबाद पोलीस ठाण्यात डंपरवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक विजय कोही हे करीत आहे.

Protected Content