जळगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जळगाव शहरातील गणेश कॉलनीतील एचडीएफसी बँकेच्या डिपॉझिट मशीनच्या माध्यमातून बँक खात्यावर बनावट चलनी नोटा भरण्याचा प्रयत्न केल्याचा प्रकार 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी 5 वाजता घडला आहे याप्रकरणी चौकशी अंती अखेर शुक्रवारी 13 डिसेंबर रोजी दुपारी 3 वाजता जिल्हापेठ पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव शहरातील गणेश कॉलनी परिसरात असलेल्या एचडीएफसी बँकेच्या डिपॉझिट मशीन मध्ये संशयित आरोपी निशिकांत कैलास पाटील याने बनावट पाचशे रुपये किमतीच्या 14 नोटा मशीन मध्ये टाकून भरणा केल्याची घटना 21 नोव्हेंबर रोजी सायंकाळी पाच वाजता घडली आहे. दरम्यान चौकशी अंती अखेर शुक्रवारी 13 डिसेंबर रोजी दुपारी तीन वाजता जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात संशयित आरोपी निशिकांत कैलास पाटील या खातेधारकावर जिल्हा पेठ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक उल्हास चराटे करीत आहे.