सर्वाधिक रस्ते अपघात ‘या’ राज्यात : नितीन गडकरी

दिल्ली-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरीयांनी भारतातील सर्वाधिक रस्ते अपघात होणाऱ्या चार राज्यांचीनावे उघड केली आहेत. शुक्रवारी संसदेच्या हिवाळी अधिवेशनादरम्यानबोलताना नितीन गडकरी यांनी सांगितले की, रस्ते अपघातात दरवर्षी 178000 लोकांचा मृत्यू होतो आणि यातील 60 टक्के बळी 18 ते 34 वयोगटातील असतात. अपघातांची संख्या कमी नव्हे तर वाढली आहे. हे मान्य करण्यात मला अजिबात संकोच वाटत नाही. हे असे एक क्षेत्र आहे जिथे आमच्या विभागाला यश मिळालेले नाही.

नितीन गडकरी यांनी सांगितले की, दिल्ली हे सर्वात जास्त प्रभावित शहर आहे, जिथे 1,457 हून अधिक मृत्यू झाले आहेत. यानंतर, बंगळुरूमध्ये 915 आणि जयपूरमध्ये 850 मृत्यू झाले आहेत. तथापी, रस्ते अपघातात इतके लोक मृत्युमुखी पडत असतानाही कायद्याचा धाक राहिलेला नसल्याबद्दल गडकरींनी नाराजी व्यक्त केली. प्रश्नोत्तराच्या तासादरम्यान त्यांनी काही लोक हेल्मेट घालत नाहीत, काही लोक सिग्नलचे उल्लंघन करतात, असही नमूद केले. भारतातील सर्वाधिक रस्ते अपघातांची संख्या असेलली राज्य -उत्तर प्रदेश: 23,652, तामिळनाडू: 18,347, महाराष्ट्र: 15,366, मध्य प्रदेश: 13,798

रस्त्यावर ट्रकचे पार्किंग हे अपघातांचे प्रमुख कारण आहे. अनेक ट्रक लेनची शिस्त पाळत नाहीत, अशी नाराजीही यावेळी नितीन गडकरी यांनी व्यक्त केली. तसेच गडकरींनी संबंधित अधिकाऱ्यांना भारतात बस बॉडी बनवताना आंतरराष्ट्रीय मानकांचे पालन करण्याचे आदेश दिले आहेत. याशिवाय, बसच्या खिडकीजवळ हातोडा ठेवण्यासंदर्भात सूचना दिल्या आहेत. जेणेकरून अपघात झाल्यास या हातोड्याने बसची काच तोडून जीव वाचवणे शक्य होईल.

Protected Content