व्यावसायिकाचे कार्यालय फोडून २ लाख ६० हजारांची रोकड लांबविली

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द गावातील वीटभट्टी व्यवसायिक यांचे महामार्गावरील कार्यालय फोडून ड्रावर मधील ठेवलेले २ लाख ६० हजार रुपयांची रोकड अज्ञात चोरट्याने चोरून नेण्याचे समोर आले आहे. या संदर्भात रविवारी ६ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्याने विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

सूत्रांकडून मिळालेली माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पाळधी खुर्द गावात कासट ग्रुपचे संचालक अनिल अशोक कासट यांचे राष्ट्रीय महामार्गावर कार्यालय आहे. या कार्यालयातूनच ते त्यांचा व्यवसायनिमित्त कामकाज पाहतात. ५ ऑगस्ट सायंकाळी ६ वाजेपासून ते  ६ ऑगस्ट पहाटे ५ वाजेच्या दरम्यान त्यांचे कार्यालय बंद असताना अज्ञात चोरट्याने खिडकीचे ग्रील उचकवून कार्यालयात प्रवेश केला. कार्यालयातील ड्राव्हर मध्ये ठेवलेले २ लाख ६० हजार रूपयांची रोकड चोरून नेल्याचे समोर आले. या संदर्भात अनिल कासट यांनी धरणगाव पोलिसात तक्रार दिली आहे. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून रविवारी ६ ऑगस्ट रोजी दुपारी ४ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल उमेश भालेराव करीत आहे.

Protected Content