कोरोना : संचारबंदीचे उल्लंघन करणाऱ्या ४ जणांवर गुन्हा

सावदा प्रतिनिधी । कोरोना प्रतिबंध कायद्यांतर्गत आज सावदा येथील भादवी कलम १८८ प्रमाणे चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत माहिती अशी की, जिल्हाधिकारी यांच्या आदेशान्वये शहरात जमावबंदी व संचारबंदी लागू करण्यात आली असतांना कायद्याचे उल्लंघन करणाऱ्या सावदा शहरातील चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. यात पुनम कालेराम परदेशी रा. चांदणी चौक, अजय अशोक महाजन रा. कोचुर, रोशन युवराज बोरोले रा. मस्कावद, अजय दीपक बोयत रा. मेहतर कॉलनी कॉलनी सावदा यांचा समावेश आहे. दरम्यान कोणीही विनाकारण शहरात कोणीही जिल्हाधिकारी यांचे संचारबंदी आदेशाचे उल्लंघन करू नये, अन्यथा कडक कायदेशीर कारवाई करण्यात येईल, याची नागरिकांनी नोंद घ्यावी, असे सावदा पोलिसांतर्फे आव्हान करण्यात येत आहे.

Protected Content