यावल तालुक्यातील ५ कॉपी बहाद्दरांवर कारवाई

copy

यावल प्रतिनिधी । माध्यमिक आणि उच्च माध्यमिक विभागाच्या परीक्षेला मंगळवार पासून सरूवात झाली. इंग्रजीच्या पहिल्याच पेपरला प्रांताधिकारी यांनी परीक्षा केंद्रावर अचानक भेट दिल्यानंतर तालुक्यातील पाच कॉपी बहाद्दरांवार कारवाई करण्यात आले.

तालुक्यात शिक्षण विभागाच्या माध्यमातून ठरवुन दिलेल्या परिक्षा केंद्रावर बारावीच्या मंगळवार पासून शालांत परिक्षा सुरू झाल्या आहेत. मंगळवारी तालुक्यातील पूर्व भागात २ हजार ३७७ तर पश्चिम भागातून २ हजार ४५४ असे एकुण ४ हजार ८३१ विध्यार्थ्यांनी इंग्रजी विषयाची परीक्षा दिली.

५ विद्यार्थ्यांवर कारवाई
फैजपूर विभागाचे प्रांताधिकारी डॉ. अजीत थोरबोले यांनी तालुक्यातील काही केंद्राना आज अचानक भेटी दिल्या. तालुक्यातील सांगवी बुद्रुक ज्योती विद्या मंदिर या शाळेच्या परीक्षा केंद्रावर १ विद्यार्थी तर यावल येथील महाविद्यालयातील परिक्षा केंद्रावर ४ विद्यार्थी अशा एकुण ५ जणांवर कॉपी करतांना आढळल्याने त्यांच्यावर प्रतीबंधक कारवाई करण्यात आली. अशी माहिती पुर्व भागाचे कस्टडीयन तथा गटशिक्षण अधिकारी एजाज शेख यांनी पत्रकारांना दिली आहे.

Protected Content