अकोला शहरात पेट्रोल पंपावर व्यवसायिकाला लुटले

अकोला-लाईव्ह ट्रेंडस न्यूज वृत्तसेवा | अकोला शहरातील पेट्रोल पंपावर दरोड्यांनी लाख रुपयांची चोरी केल्याची घटना समोर आली आहे. दरोड्यांनी पेट्रोल पंपावरील व्यवसायिकाला लुटले. डोळ्यात मिरची पूड फेकत चाकूच्या धाकेवर चोरी केली. या चोरीच्या घटनेनंतर परिसरात एकच खळबळ उडाली आहे. चोरीच्या घटनेनंतर पोलिसांना घटनेची माहिती देण्यात आली, पोलिसांनी तीन अज्ञातावर गुन्हा दाखल केला आहे. गेल्या काही दिवसांपासून चोरीच्या घटना वाढत असल्याने नागरिकांमध्ये घबराट निर्माण झाली आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, अकोला शहरातील मूर्तीजापूर येथे ही घटना घडली. शुक्रवारी १० वाजता रात्री पेट्रोल पंपावर व्यवसायिकाला लुटले आहे. दिनेश बाबू असे व्यवासायिकाचे नाव आहे. ते चारचाकी घेऊन पेट्रोल पंपावर आले. त्यावेळीस दुचाकीवरून दोन जण आले. त्यांनी कारच्या समोर येऊन व्यवसायिकाच्या डोळ्यात मिरची पूड घातली. त्यांना चाकूने धमकवून त्यांच्या कारमध्ये ठेवलेली बॅग लुटले. बॅगेत तीन लाख रुपये होते.

चोरटे बॅग घेऊन फरार झाले. स्थानिकांनी या घटनेची माहिती पोलिसांना दिली. घटनेची माहिती मिळताच, पोलिस निरिक्षक भाऊराव घुगे, ग्रामीण पोलिस स्टेशनचे पोलिस निरिक्षक कैलाश भगत याच्यासह वरिष्ठ पोलिस अधिकारी आणि अकोला पोलिसांच्या स्थानिक गुन्हे शाखेचे पथक घटनास्थळी दाखल झाले. दिनेश बाबू यांच्यावर हल्ला झाला. त्यामुळे ते जखमी झाले. पोलिसांनी त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. दरोडेखोर अमरावतीच्या दिशेने पळले आहे अशी माहिती पोलिसांना मिळाली. पोलिसांनी तीन जणांवर गुन्हा दाखल केला आहे. पोलिस सीसीटीव्ही फुटेज तपासत आरोपीचा शोध घेत आहे.

Protected Content