ओव्हरटेकच्या नादात बसची ट्रकला धडक; एक गंभीर जखमी

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी  । धरणगाव तालुक्यातील एकलग्न गावाजवळ ओव्हरटेक करण्याच्या नादात बसची कंटेनरला धडक दिल्याने एकजण गंभीर जखमी झाल्याची घटना घडली होती. याप्रकरणी बुधवारी १२ जुलै रोजी दुपारी १ वाजता धरणगाव पोलीस ठाण्यात अज्ञात बस चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

याबाबत अधिक माहिती अशी की, परशूराम आत्माराम चौधरी (वय-४०) रा. बहादरपूर ता.पारोळा हे मंगळवारी ११ जुन रोजी दुपारी ४ वाजेच्या सुमारास इगतपुरी डेपोची बस क्रमांक (एमएच ४० एक्यू ६०१०) मध्ये बसून जळगावकडून पारोळा येथे जात होते. धरणगाव तालुक्यातील एकलग्न गावानजीक बसच्या पुढे जात असलेल्या कंटेनरला बसने ओव्हरटेक करण्याचा प्रयत्न केला असता बसने कंटेनरला जोरदार धडक दिली. या धडकेत परशूराम चौधरी यांच्या पाय फ्रॅक्चर होवून गंभीर दुखापत झाली. त्यांना तातडीने जिल्हा शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल करण्यात आले. यात बसच्या पुढच्या भागाचे नुकसान झाले आहे. याप्रकरणी परशूराम चौधरी यांनी दिलेल्या फिर्यादीवरून बसवरील अज्ञात चालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेचा पुढील तपास पोहेकॉ उमेश भालेराव करीत आहे.

Protected Content