जळगाव लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी । सासरवाडीहून जळगाव येथे परतत असतांना दुचाकी स्लीप झाल्याने गंभीर दुखापत होवून राजेंद्र गोपाळ तायडे (वय-५५, रा. मोहाडी ता.जि.जळगाव) यांचा मृत्यू झाल्याची घटना सोमवारी १८ डिसेंबर रोजी सायंकाळी साडेसात वाजेच्यासुमारास अजिंठा घाटजवळ घडली आहे. या घटनेमुळे मोहाडी गावात शोककळा पसरली आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, जळगाव तालुक्यातील मोहाडी येथील राजेंद्र गोपाळ तायडे हे आपल्या पत्नी, दोन मुलं यांच्यासह वास्तव्याल होते. ते जळगाव महानगरपालिकेतील पाणीपुरवठा विभागात वाटरसप्लाय म्हणून कार्यरत होते. छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यातील सासरवाडी असल्यामुळे ते दुचाकीने कामानिमित्त भेटीसाठी गेले होते. काम आटपून सोमवारी १८ डिसेंबर रोजी दुचाकीने जळगावकडे परतत असताना सायंकाळी ७.३० वाजेच्या सुमारास अजिंठा घाटनजीक त्यांची दुचाकी स्लिप झाली. या अपघातात त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. ही घटना घडल्यानंतर मोहाडी गावातील नातेवाईकांनी धाव घेतली. त्यांच्या मृत्यूमुळे गावात शोककळा पसरली आहे. त्यांच्या पश्चात पत्नी शकुंतला, पवन आणि सनी ही दोन मुले आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे.