किरकोळ कारणावरून तरूणाच्या डोक्यात टाकली बिअरची बाटली

भुसावळ-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । भुसावळ तालुक्यातील शिवपूर कन्हाळा रोडवरील जलसा हॉटेलवर तरूणाला शिवीगाळ करत डोक्यात बिअरची बाटली फोडल्याची घटना शुक्रवारी १४ जून रोजी दुपारी साडेचार वाजता घडली आहे. याप्रकरणी शनीवारी १५ जून रोजी मध्यरात्री १ वाजता भुसावळ तालुका पोलीस ठाण्यात एकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, शिवपूर कन्हाळा रोडवरील जलसा हॉटेलवर शुक्रवारी १४ जून रोजी दुपारी साडेचार वाजता गजानन रतन घुले वय-३७ रा. शिवपूर ता. भुसावळ या तरूणालासह त्यांचा भाचा प्रविण संजय जयकर यांच्यासोबत यशवंत गुणवंत पाटील (वय-३७ रा. शिवपूर कन्हाळा, ता. भुसावळ) व त्याच्या सोबतच्या अनोळखी तिघां वाद घातला. यावेळी यशवंत पाटील याने प्रवीण जयकर यांच्या डोक्यावर बिअरची बाटली फोडून डोक्याला गंभीर दुखापत केली. तर भाचा प्रविण जयकर याना बेदम मारहाण केली. याप्रकरणी शनीवार १५ जून रोजी मध्यरात्री १ वाजता गजानन घुले यांनी दिलेल्या फिर्यादीवरून यशवंत पाटील व त्यांच्या सोबतच्या अनोळखी तीन जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दरम्यान, पोलीस निरीक्षक बबन जगताप यांनी घटनास्थळी भेट दिली. पुढील तपास पोहेकॉ गणेश राठोड करीत आहे.

Protected Content