आ.अमोल पाटील यांचा होमगार्ड बांधवांतर्फे सत्कार

पारोळा लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । नवनिर्वाचित आमदार अमोल पाटील यांचा पारोळा तालुक्यातील होमगार्ड बांधवांच्या वतीने सत्कार करण्यात आला.

होमगार्ड बांधव उन्हात पावसात थंडीत व पर राज्यात आपले कर्तव्य निभावणारे गृह रक्षक दलाचे जवान यांनी सत्कार करून आपले मनोगत व्यक्त केले. शासनाकडून ६७० रुपये रोज मानधन मिळत होते. या शासनाने मानधनात वाढ केली. त्यामुळे होमगार्डमध्ये आनंदाचे वातावरण असून गृह रक्षक दल यांना बाराही महिने काम मिळावे म्हणून व्यथा व्यक्त केली. त्यावर आमदार अमोल पाटील यांनी शासन आपल्या सोबत असून मुख्यमंत्री साहेबांकडे पाठपुरावा करून महाराष्ट्रातील गृह रक्षक दल यांच्या बद्दल सहानुभूती व्यक्त केली.

याप्रसंगी गृहरक्षक दलातील प्रभाकर पाटील, अरुण पाटील, मयाराम पाटील, नंदू राजहंस, छोटू कासार, अभय पाटील, पंजाबराव बोरसे, वासुदेव भोई, विलास शिंदे, सुनील माळी, भरत कोळी, मिलिंद चौधरी यांनी सत्कार केला. तसेच आ. अमोल पाटील यांनी होमगार्ड बांधवांना शुभेच्या दिल्या.

Protected Content