मुक्ताईनगर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । मुक्ताईनगर येथे बौद्ध समाज बांधव समस्त जागरूक व सुज्ञ भारतीय नागरिक आणि संविधानाचे संरक्षक यांनी मिळून परभणी येथील समाजकंटक देशद्रोही युवकाने भारतीय संविधानाची विटंबना केल्याबाबत त्यांचेवर देशद्रोहाचा लावून गुन्हा नोंद करण्याची मागणी निवेदनाद्वारे केलेली आहे.
परभणी येथे देशद्रोही असलेल्या एका इसमाने काही माथेफिरूंच्या सांगण्यावरून डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे पुतळ्या समोरील भारतीय संविधानाची प्रतिकृतीची विटंबना केली आहे. सदर इसमाने हे कृत्य कोणाच्या सांगण्यावरून केले?, सदर घटनेचा मुक्ताईनगर येथील तमाम बौद्ध बांधव यांनी तीव्र शब्दात निषेध केला. या घटनेची सखोल तपास करून त्याचे मागे असलेल्या मुख्य सुत्रदाराचा शोध घेऊन कठोर कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा भीमसैनिक रस्त्यावर उतरून तीव्र स्वरूपाचे आंदोलन करतील असा इशारा सदर निवेदनात दिलेला आहे.
याप्रसंगी विविध संघटनांचे पदाधिकारी सामाजिक कार्यकर्ते भीमसैनिक सुधाकर बोदोडे, जयपाल बोदडे, मोहन मेढे, रवींद्र बोदोडे, अनिल बोदडे, गणेश मोरे, विजय तायडे, कुणाल गवयी, निखिल बोदडे, सचिन झनके, अमोल बोदोडे, नाना बोदडे, रमेश बोदडे, विजय बोदडे, प्रमोद सौंदळे आदी समाज बांधव मोठ्या संख्येने हजर होते.