यावल लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । यावल तालुक्यातील फैजपूर येथील नगरपालिकेत नवनिर्वाचित आमदार अमोल जावळे यांनी अचानक भेट दिली. यावेळी नागरी समस्यांबाबत पालिकेच्या सर्व विभागाच्या प्रमुखांना जाब विचारला आहे. तसेच नागरीकांच्या समस्या तातडीने सोडवाव्यात अश्या सुचना दिल्या आहेत. आ.जावळे यांनी अचानक भेट दिल्याने पालिकेत एकाच गोंधळ उडाल्याचे पहायला मिळाले.
आमदार अमोल जावळे यांनी फैजपूर पालिकेत जावून पालिकेच्या समस्या काय आहेत व त्या कश्या सोडविल्या जातील याबाबत त्यांनी माहिती जाणून घेतली. यात प्रामुख्याने स्वामी समर्थ केंद्र जवळील फुटलेले गटारीमुळे पाणी थेट रस्त्यात येत आहे. यामुळे नागरीक त्रस्त झाले आहेत. शहरातील स्ट्रीट लाईट बंद असल्याबाबत तक्रारी केल्या परंतू त्याचे निराकरण अद्याप करण्यात आलेली नाही. आठवडे बाजार येथील गेल्या ४ वर्षात सुलभ शौचालय अद्याप ही सुरू न झाल्यानं नागरिकाना सुविधा का पुरविण्यात येत नाही. याबाबत सविस्तर माहिती घेऊन लवकरच या समस्या निराकरण करावे तसेच अनियमित पाणी पुरवठा कसा काय होते. याबाबत वीज वितरणची एकफेज फिडर लाईन असताना सुध्दा अवेळी पाणी पुरवठा होत आहे. ही समस्या देखील तातडीने सोडविण्यात याव्यात अश्या सुचना देत यावल शहरातील आरोग्य, पाणी, दिवा बत्ती अशा महत्वाचे कामे वेळेवर झाली याबाबत सर्व विभाग प्रमुखांनी तक्रार पुस्तक सोबत याचे निराकरण झाले की नाही याची सुध्दा नोंद विभाग प्रमुख यांनी घ्यावी अशी सूचना आ अमोल जावळे यांनी केली.
यावेळी आ.अमोल जावळे, प्रशासक तथा प्रांताधिकारी बबनराव काकडे, सहकार्यालयीन अधिक्षक संगीता बाक्षे, पालिका अभियता नगर रचना विभाग ऐश्वर्या पिंगळे, भाजपाचे सर्व कार्यकर्ते यांची उपस्थिती होती.