आव्हाणे शिवारात ६ फुट लांब अजगर आढळला

WhatsApp Image 2019 09 17 at 6.01.53 PM

जळगाव, प्रतिनिधी | आव्हणे शिवारातील एका जिनिंगमध्ये काल एक भला मोठा साप तेथील कामगारांना दिसला. त्यास सर्पमित्र यांनी पकडून त्याच्या नैसर्गिक अधिवासात त्यास सोडले.

लक्ष्मी जिनिंग आव्हाणे शिवार या ठिकाणी काल संध्याकाळी ६ वाजे दरम्यान या असगर जातीचा भला मोठा साप तेथील कामगारांना दिसला. कामगारांना भलामोठा साप दिसल्याने त्यांची तारांबळ उडाली. कामगारांनी तत्काळ जिनिंगमध्ये काम करणारे सर्पमित्र रवींद्र भोई व जिजामाता विद्यालयात शिक्षक असलेले सर्प अभ्यासक किशोर पाटील यांना फोनेद्वारे कळविण्यात आले. ते ताबडतोब जिनिंगमध्ये पोहचले. दोघांनी ६ फुट मोठ्या अजगराला त्यांच्या ताब्यात घेतले. अजगराचा जीव कामगार व परिसरातील नागरिकांपासून वाचविला. अजगराला ताब्यात घेतल्या नंतर वनपरिक्षेत्र जळगाव येथील एन. जी. पाटील यांना कळविले. त्यांनी अजगराला त्याच्या नैसर्गिक अशा सुरक्षित अधिवासामध्ये सोडले.

Protected Content