जळगावात आयएमए सदस्यांसाठी मोफत योग शिबीराचे आयोजन

yoga melawa chalisagoan

जळगाव प्रतिनिधी । शहरातील मु.जे.महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग ॲण्ड नॅचरोपॅथी या विभागांतर्गत एम.ए. द्वितीय वर्षीय विद्यार्थ्यांचा अभ्यासक्रम उपक्रमांतर्गत दहा दिवसीय योग शिबीराचे आयोजन आयएमए हॉलमध्ये करण्यात आले आहे.

मु.जे.महाविद्यालयाच्या सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग ॲण्ड नॅचरोपॅथी विभागाच्या एम.ए. द्वितीय वर्षीय विद्यार्थ्यांच्या अभ्यासक्रमाचा भाग म्हणून डॉ. तिलोत्तमा गाजरे या ‘योग संजिवन’ या विषयावर मार्गदर्शन आणि संबंधित योगाचे प्रात्यक्षिके केले जाणार आहे. आयएमएच्या सदस्यांसाठी मंगळवार 18 सप्टेंबर पासून 27 सप्टेंबरपर्यंत सकाळी 7 ते 8 वाजेदरम्यान असे दहा दिवसीय हे शिबीर मोफत आहेत. तरी आयएमएच्या सदस्यांनी या योगशिबीराचा लाभ घ्यावा असे आवाहन सोहम् डिपार्टमेंट ऑफ योग ॲण्ड नॅचरोपॅथीतर्फे करण्यात आले आहे.

Protected Content