फैजपूर, प्रतिनिधी । आदिवासी भागातील बोरखेडा ते तिळया अंधारमळी व मोहमांडली रस्त्याची दुर्दशा झाली असून रस्त्याची अक्षरशः चाळण झालेली आहे. रस्ते सुधारण्यासाठी आदिवासी एकता मंचतर्फे फैजपूर प्रांताधिकारी यांना निवेदन देण्यात आले आहे.
आदिवासी भागातील बोरखेडा ते तिळया अंधारमळी व मोहमांडली ह्या रस्त्याची दुर्दशा झाली आहे. या रस्त्यांची अक्षरशः चाळण झालेले आहे. या तिन्ही गावात १००% आदिवासीचा राहवास आहे. दवाखाने, बाजार, शाळा, कॉलेज या सर्व सुविधा फैजपूर येथे आहेत. फैजपूर जाण्यासाठी एकमेव हाच एक रास्ता आहे तो ही खराब असल्यामुळे स्थानिकांना त्रास सहन करावा लागत आहे. हा रस्ता मंजूर आहे किंवा नाही व मंजूर असेल तर रस्ता चे काम का केले नाही या विषयी चौकशी करावी व आदिवासी बांधवांचे समस्या सोडवावी अन्यथा आदिवासी एकता मंच यांच्या मार्फत तीव्र आंदोलन करण्यात येईल असा इशारा देण्यात आला आहे. निवेदन देतांना आदिवासी एकता मंचचे जिल्हा संघटक रब्बील तडवी, यावल तालुका अध्यक्ष सरदार तडवी, मुस्तुफा अरमान तडवी, जहागीर सिकंदर तडवी, फरीद शवखा, जावेद फकीर, समीर मोहंमद तडवी व पदाधिकारी उपस्थित होते.