साहित्य संस्कृती मंडळातर्फे कोजागिरी पौर्णिमेनिमित्त रंगली काव्य मैफिल

 

पहूर , ता.जामनेर प्रतिनिधी । जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाच्या पहूर शाखेतर्फे कोजागिरी पौर्णिमेचे औचित्य साधत काव्य मैफिलीचे आयोजन करण्यात आले .

सावित्रीबाई फुले माध्यमिक विद्यालयात झालेल्या या काव्य मैफिलीचे अध्यक्षस्थान महात्मा फुले शिक्षण संस्थेचे अध्यक्ष बाबुराव आण्णा घोंगडे यांनी भूषविले. यावेळी जामनेर तालुका साहित्य सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष दीनबंधू डी .डी . पाटील यांची प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थिती होती .या प्रसंगी शालेय विद्यार्थ्यांसह नवोदित कवींनी आपल्या कविता सादर केल्या . ‘ शाळा झाली पोरकी ‘, ‘ कोरोना आला गावा ‘ , ‘आई ‘ , ‘ शिक्षक ‘ , ‘माझा बाप शेतकरी ‘ , ‘कोरोनाने दिला जगण्याचा नवा मंत्र ‘ , ‘ जागर स्त्री शक्तीचा ‘ , ‘ सारीपाठाची खेळी तू ग मांडली रानभर ‘ ‘जगता आले पाहीजे ‘ , ‘ माझे कुटूंब ..माझी जबाबदारी .. ‘आदी कवितांनी मैफिलीत रंग भरला. प्रारंभी मान्यवरांचा गुलाब पुष्प देऊन सत्कार करण्यात आला. कवी श्रीकांत पाटील यांनी ‘प्रतिबिंब ‘ हा त्यांचा काव्यसंग्रह उपस्थितांना भेट म्हणून दिला. याप्रसंगी शिघ्रकवी विश्वनाथ वानखेडे , साहित्य -सांस्कृतिक मंडळ , पहूर शाखेचे अध्यक्ष डॉ . प्रशांत पांढरे , कोषाध्यक्ष भारत पाटील , कथाकथनकार रमेश बनकर ,सदस्य डॉ . संभाजी क्षीरसागर , सदस्या कीर्ती घोंगडे , प्रणव सपकाळे , प्रथमेश लहासे यांच्यासह काव्य रसीक उपस्थित होते . सचिव शंकर भामेरे यांनी सुत्रसंचालन केले . सदस्य हरिभाऊ राऊत यांनी आभार मानले . यावेळी कोरोना विषाणू संक्रमणाच्या अनुषंगाने सोशल डिस्टन्सीगचे पालन करण्यात आले .

Protected Content