सावदा वृक्ष मित्र मंडळातर्फे ३ हजार वृक्ष लागवड

सावदा ता. रावेर प्रतिनिधी । येथे गेल्या दोन तीन वर्षापासुन स्थापन झालेल्या संत तुकाराम वृक्ष सेवा मंडळ कार्यरत असुन दरवर्षी वृक्ष लागवड व त्यांचे संवर्धनाचे कार्य करीत आहे. त्याप्रमाणे, यंदा देखील ३ हजार वृक्ष लागवड करण्यात आले आहे.  

दरम्यान, मागील लावलेल्या झाडान मधे ९५ टेक्के झाड जगवलेली आहे. आता या वर्षी मीयावाकी या जापनीज जंगल प्रकल्प पध्दतीने ३००० वृक्षांची लागवड करण्यात आली. प, पू, जनार्दन हरी जी महाराज व महंत सुरेश राज शास्त्री मानेकर बाबा यांच्या हस्ते शुभारंभ करण्यात आला. या कार्यक्रमात प्रा,व ,पू होले,न, पा अधिकारी सौरभ जोशी साहेब, डॉ, शेखर पाटील, अॅड, कालीदास ठाकुर, डॉ, राजीव पाटील , नंदु पाटील सर , योगेश महाजन सर, महेश चौधरी , व संपुर्ण वृक्ष मित्र टीम युवा सदस्य हजर होते.

 

Protected Content