भुसावळ, प्रतिनिधी । फ्रान्सच्या एका नागरिकाद्वारे इस्लाम धर्माचे धर्मगुरू हजरत मोहम्मद स. यांचे विटंबना करणारे कार्टून काढण्यात आल्याने त्याच्या निषेधार्थ भारताने फ्रान्स सोबतचे आर्थिक हित संबंध तोडण्यात यावे अशी मागणी मुस्लिम समाज मंचतर्फे करण्यात आली आहे.
निवेदनाचा आशय असा की, फ्रान्सच्या एका नागरिकाद्वारे इस्लाम धर्माचे धर्मगुरू हजरत मोहम्मद स. यांचे विटंबना करणारे कार्टून काढण्यात आले आहे. फ्रान्स सरकारच्या अध्यक्षांच्या निर्णयामुळे जागतिक सर्व मुस्लिम समाजाची भावना दुखावलेली आहे. भारतात देखील या निंदनीय प्रकाराचा सर्वत्र निषेध होत आहे. आम्ही भुसावळ शहर चे समस्त नागरिक मुस्लिम समाजातर्फ आपल्या द्वारे भारताचे राष्ट्रपती यांना निवेदन सादर करतो की फ्रान्स या देशाचे भारतातून आर्थिक संबंध तोडण्यात यावेत. फ्रान्सचे अध्यक्षा तसेच नागरिकांना भारतात प्रवेश करण्यास बंदी कण्यात यावी . फ्रान्सच्या निंदनीय निर्णय रद्द करण्यासाठी भारत सरकारतर्फे दबाव टाकण्यात यावा अशी मागणी करण्यात आली आहे. निवेदनांवर साबीर शेख, मौलाना अब्दुल हकीम, मौलाना गुलाम जिलनी, जुनेद आशफक खान आदींच्या स्वाक्षरी आहे.