जळगाव प्रतिनिधी l आपल्या कारकिर्दीमध्ये प्रचंड वादग्रस्त ठरलेल्या तहसीलदार वैशाली हिंगे यांची आज अखेर बदली करण्यात आले असून याबाबतचे आदेश आज प्रशासनाला प्राप्त झालेले आहेत.
तहसीलदार वैशाली हिंगे यांची कारकीर्द प्रचंड वादग्रस्त राहिलेली आहे. जळगाव येथील तहसीलदार पदाची सूत्रे हाती घेतल्यापासून देखील त्या अनेकदा वादाच्या भोवऱ्यात सापडल्या होत्या. माहिती अधिकार कार्यकर्ते दीपक कुमार गुप्ता यांनी त्यांच्या गैरव्यवहाराची अनेक प्रकरणे समोर आणली होती. यानंतर त्यांनी गुप्ता यांच्यावर गुन्हा देखील दाखल केला होता. तथापि गुप्ता यांनी त्यांच्या विविध प्रकरणांचा पाठपुरावा सुरू केला होता. यात भुसावळ तालुक्यातील एका जमिनीचा नजराना न भरण्याचे प्रकरण चांगलेच गाजले होते. अखेर या सर्व बाबींची दखल घेऊन तहसीलदार वैशाली हिंगे यांची आज बदली करण्यात आली आहे. याबाबतचे आदेश प्रशासनाने जाहीर केले आहेत. त्यांची नंदुरबार येथील सरदार सरोवर प्रकल्पामध्ये बदली करण्यात आल्याचे या आदेशात म्हटलेले आहे.