Home Uncategorized फूलबासन यांनी ५० लाख रुपये जिंकले

फूलबासन यांनी ५० लाख रुपये जिंकले

0
40

नवी दिल्ली : वृत्तसंस्था । कौन बनेगा करोडपती. शोमध्ये करमवीर एपिसोड पार पडला. या एपिसोडमध्ये केबीसीला ५० लाख रुपये जिंकणारा पहिला स्पर्धक मिळाला . छत्तीसगढमधील लहानशा गावात राहणाऱ्या फूलबासन या महिला स्पर्धकाने ५० लाख रुपये जिंकले आहेत.

करमवीर एपिसोडमध्ये फूलबासन यांच्यासोबत अभिनेत्री रेणुका शहाणे यांनी हजेरी लावली होती. या शोमध्ये एकावर एक असे कठीण टप्पे पार पाडत फूलबासन यांनी तब्बल ५० लाख रुपये जिंकले आहेत. यंदाच्या पर्वात सगळ्यात जास्त रक्कम जिंकणाऱ्या त्या पहिल्या स्पर्धक ठरल्या आहेत.

हा होता ५० लाखांसाठी विचारलेला प्रश्न

यापैकी हिमालच प्रदेशमध्ये अवैध खाणकामाँविरोधात आवाज उठवणारी पर्यावरणवादी कोण?

A- किंकरी देवी

B- दया बाई

C- मानसी प्रधान

D- चुनी कोटल

अमिताभ बच्चन यांनी हा प्रश्न विचारल्यानंतर फूलबासन आणि रेणुका या दोघी कोड्यात पडल्या होत्या. दोघींनाही या प्रश्नाचं उत्तर माहित नव्हतं आणि त्यांच्याकडे केवळ एकच लाइफलाइन शिल्लक राहिली होती. त्यामुळे त्यांनी एक्सपर्टचा सल्ला घेतला आणि या प्रश्नचाचं उत्तर किंकरी देवी असल्याचं सांगितलं. एक्सपर्टच्या सल्ल्यावर विश्वास ठेवत फूलबासन यांनी किंकरी देवी या उत्तरावर शिक्कामोर्तब केलं आणि ५० लाख रुपयांची रक्कम त्या जिंकल्या


Protected Content

Play sound