पाचोरा प्रतिनिधी । गिरीश महाजन यांनी सरकार पाडण्याचे प्रयत्न करण्यापेक्षा आधी ‘मुक्ताईनगर’ सांभाळावे असा टोला पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी लगावला. येथील शिवतीर्थचे उदघाटन करतांना पालकमंत्र्यांनी जोरदार फटकेबाजी केली.
पाचोरा येथील माजी आमदार स्वर्गीय आर. ओ. पाटील यांनी त्यांच्या काळात उभारलेल्या शिवतीर्थ या वास्तूचे सुशोभीकरण व खत कारखान्याची नूतन इमारत व यंत्रांच्या उद्घाटनप्रसंगी पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांनी आपल्या मनोगतातून केलेली जोरदार टोलेबाजी ही चर्चेचा विषय ठरली. ते म्हणाले की, महाजनांनी त्यांच्या मंत्री काळात अनेक आरोग्य शिबिरे घेतले. मात्र, सध्या कोरोना काळात आरोग्य शिबिर घेण्याची गरज असताना ते स्वतः व त्यांचे आरोग्य दूतही गायब झाले आहेत. त्यांच्या काळात सिव्हिलमध्ये केवळ ७ व्हेंटिलेटर होते. आम्ही ही संख्या १००वर पोहोचवून जिल्ह्यात कोरोनाची संख्या आटोक्यात आणली.
याप्रसंगी पालकमंत्र्यांनी आ. गिरीश महाजन यांच्यावरही जोरदार टीका केली. ते म्हणाले की, राज्यात भाजपच्या हातून सत्ता गेल्याने गिरीश महाजन कावरे बावरे झाले आहेत. त्यांना सत्तेशिवाय करमत नसल्याने ते नेहमी, हे तीन चाकांचे सरकार आहे, ते जास्त दिवस टिकणार नाही, असे सांगून सरकार पाडण्याची भाषा करतात. परंतु, माजी मंत्री गिरीश महाजन यांनी सरकार पाडण्याची भाषा करण्यापेक्षा त्यांचे मुक्ताईनगर सांभाळण्यात वेळ घालवावा असा सल्लादेखील ना. पाटील यांनी दिला.
शिवतीर्थ येथील प्रांगणात झालेल्या सभेत मंत्री पाटील म्हणाले की, महाजनांनी त्यांच्या मंत्री काळात अनेक आरोग्य शिबिरे घेतले. मात्र, सध्या कोरोना काळात आरोग्य शिबिर घेण्याची गरज असताना ते स्वतः व त्यांचे आरोग्य दूतही गायब झाले आहेत. त्यांच्या काळात सिव्हिलमध्ये केवळ ७ व्हेंटिलेटर होते. आम्ही ही संख्या १००वर पोहोचवून जिल्ह्यात कोरोनाची संख्या आटोक्यात आणली.
या कार्यक्रमास आमदार किशोर पाटील, नगराध्यक्ष संजय गोहिल, उपनगराध्यक्ष शरद पाटे, मुख्याधिकारी शोभा बाविस्कर, पालिकेच्या गटनेत्या सुनीता पाटील, जिल्हा परिषदेचे गटनेते रावसाहेब पाटील, जिल्हा परिषद सदस्य पद्मसिंह पाटील, दीपक राजपूत, उद्धव मराठे, शेतकरी सेनेचे जिल्हा अध्यक्ष अरुण पाटील, तालुका प्रमुख शरद पाटील, रमेश बाफना, मुकुंद बिल्दीकर, नगरसेवक शीतल सोमवंशी, सतीश चेडे, धर्मेंद्र चौधरी, डॉ. वरद पाटील, अॅड. अभय पाटील, रहेमान तडवी, जितेंद्र पेंढारकर, अनिकेत सूर्यवंशी यांच्यासह नागरिक उपस्थित होते.