Home धर्म-समाज मृताच्या कुटुंबियांना मदत मिळवून देणार : आ. चंद्रकांत पाटील ( Video )

मृताच्या कुटुंबियांना मदत मिळवून देणार : आ. चंद्रकांत पाटील ( Video )

0
52

रावेर शालीक महाजन । तालुक्यातील बोरखेडा येथील चार भावंडांचा अतिशय क्रूर पध्दतीत खून झाल्याची घटना उघडकीस आली असून त्यांच्या कुटुंबियांना शासकीय मदत मिळवून देणार असल्याचे प्रतिपादन आमदार चंद्रकांत पाटील यांनी केले. ते मृताच्या कुटुंबियांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलत होते.

आज पहाटेच बोरखेडा येथील शिवारात राहणार्‍या चार भावंडांचा खून झाल्याची घटना उघडकीस आली. यात दोन मुली आणि दोन मुलांचा समावेश असून त्यांच्यावर कुर्‍हाडीने वार करण्यात आले असल्याचेही दिसून आले. ही माहिती मिळाल्यानंतर आमदार चंद्रकांत पाटील यांनी तातडीने मृत मुलांच्या कुटुंबियांची भेट घेऊन त्यांचे सांत्वन केले.

आ. चंद्रकांत पाटील म्हणाले की, आज सकाळीच मुख्यमंत्र्यांनी या घटनेची माहिती जाणून घेतली असून सखोल चौकशीचे आदेश दिले आहेत. अगदी गरीबीच्या परिस्थितीत राहणार्‍या या आदिवासी कुटुंबावर संकटाचा डोंगर कोसळला असून त्यांना आपण शासकीय मदत मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणार असल्याचेही आ. चंद्रकांत पाटील यांनी याप्रसंगी नमूद केले.

खालील व्हिडीओत पहा आ. चंद्रकांत पाटील नेमके काय बोललेत ते ?

https://www.facebook.com/508992935887325/videos/370419904104230


Protected Content

Play sound