किरकोळ कारणावरून काकूला पुतण्याकडून मारहाण; नगरदेवळा पोलीसात गुन्हा

पाचोरा प्रतिनिधी । गावात नातेवाईकांविरोधात वाईट शब्द बोलल्याच्या कारणावरून पोलीस पुतण्याने काकूला मारहाण करून हात मोडल्याची घटना तालुक्यातील वडगाव खुर्द येथे घडली. याप्रकरणी नगरदेवळा पोलीस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.

याबाबत सविस्तर वृत्त असे की,  ममता संजय पाटील (परिहार) रा. वडगाव खुर्द हे नळावर पाणी भरत असतांना तिचा पुतण्या महेंद्रसिंग विजयसिंग परिहार हा येवून शिवीगाळ करू लागला,  ‘आमच्या चुगल्या लावून आमच्याबद्दल वाईट शब्द बोलते’ असे बोलून शिवीगाळ केली. तर डोक्याचे केस पकडून लाथाबुक्क्यांनी मारहाण केली तर काठी मारून हाताचे हाड मोडले.  संशयित आरोपी महेंद्रसिंग हा नवापूर ता.जि. नंदूरबार येथे पोलीस म्हणून नोकरी करत आहे.  जखमी अवस्थेत महिलेचे पती संजय पाटील यांनी रिक्षाचे खासगी हॉस्पिटलमध्ये उपचारार्थ दाखल केले. महिलेच्या फिर्यादीवरून नगरदेवळा पोलीस ठाण्यात संशयित आरोपी महेंद्रसिंग परिहार याच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

Protected Content