Home राजकीय मोदी पीडित असल्याचे भासवतात; सोनिया गांधींचा आरोप

मोदी पीडित असल्याचे भासवतात; सोनिया गांधींचा आरोप


अहमदाबाद (वृत्तसंस्था) पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतः पीडित असल्याचे दाखवून देण्याचा प्रयत्न करतात, पण प्रत्यक्षात त्यांच्या चुकीच्या धोरणांमुळे देशाची जनता पीडित झाली आहे, अशा शब्दात यूपीएच्या अध्यक्षा सोनिया गांधी यांनी आज गुजरातमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदींवर टीकास्त्र सोडले आहे. दरम्यान, तब्बल ५८ वर्षांनी गुजरातमध्ये काँग्रेस कार्यकारिणीची बैठक झाली. याआधी १९६१ मध्ये भावनगरमध्ये काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली होती.

 

अहमदाबादमधील सरदार पटेल राष्ट्रीय स्मारक येथे काँग्रेसच्या कार्यकारिणीची बैठक झाली. त्यात सोनियांनी मोदींवर निशाणा साधला. राष्ट्रहितासंबंधी मुद्द्यांवर मोदी सरकार राजकारण करत आहे, असा आरोप त्यांनी केला. माजी पंतप्रधान मनमोहन सिंग यांनीही मोदी सरकारवर तोफ डागली. सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे अर्थव्यवस्था कोसळली,असे ते म्हणाले. तत्पूर्वी, पुलवामा हल्ल्यातील शहीद जवानांना श्रद्धांजली वाहिल्यानंतर काँग्रेस कार्यकारिणीच्या बैठकीला सुरुवात झाली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound