‘चांगला स्पर्श – वाईट स्पर्श’ विषयावर प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन

चाळीसगाव (प्रतिनिधी) वसुंधरा फाउंडेशन चाळीसगावतर्फे टाइम्स फाऊंडेशन मुंबई व चाइल्ड लाईन या संस्थांच्या सहकार्याने येथे ‘मासूम’ या बाल लैंगिक अत्याचार विषयावर आधारित उपक्रमा अंतर्गत तालुक्यातील सर्व प्राथमिक व माध्यमिक शाळांमधील प्रत्येकी एक शिक्षक अथवा प्रतिनिधीसाठी प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे.

 

सध्याच्या काळात बाल शोषण व छळवणूक याबाबत आपण नेहमी ऐकत असतो. बाल लैंगिक शोषणाच्या घटना टाळण्यासाठी विद्यार्थ्यांना ‘चांगला स्पर्श – वाईट स्पर्श’ (Good touch and Bad touch) याबाबत माहिती देणे आवश्यक आहे, जेणेकरून या समस्येवर मात करता येते. त्यासाठीच येथे दिनांक १४ मार्च २०१९ रोजी सकाळी १० वाजता अरिहंत मंगल कार्यालयात या प्रशिक्षण कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे. कार्यशाळेत प्रत्येक शाळेतील एक शिक्षक याप्रकारे सुमारे २००-२५० शिक्षकांना प्रशिक्षण देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांच्या माध्यमातून हजारो विद्यार्थ्यांमध्ये याबाबत जागरूकता निर्माण होऊन बाल लैंगिक अत्याचार रोखण्यास मदत होणार आहे.

Add Comment

Protected Content