कृषी विधेयक कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचाच – खासदार रक्षा खडसे

रावेर (शालिक महाजन) । केंद्र सरकारने कृषी विधेयक मंजूर केल्याने विरोधकांकडून शेतकऱ्यांमध्ये चुकीचा संदेश दिला जात आहे. कृषी विधेयक कायदा हा शेतकऱ्यांच्या हिताचा असून त्यांची कोणतीही फसवणूक होणार नाही, आता मालाचा भाव ठरविण्याचा निर्णय शेतकऱ्यांना राहणार असल्याची माहिती खासदार रक्षाताई खडसे यांनी लाईव्ह ट्रेन्डस् न्यूजशी बोलतांना सांगितले.

शहरात खासदार रक्षाताई खडसे यांनी आजहस्ते राष्ट्रपिता महात्मा गांधी व माजी पंतप्रधान लालबहादुर शास्त्री जयंतीनिमित्त डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात हातात झाडू घेऊन स्वच्छता अभियान राबविण्यात आले त्यावेळी त्या बोलत होत्या.

यावेळी त्यांच्या सोबत भाजपा जिल्हाध्यक्ष तथा आमदार राजूमामा भोळे, भाजपा उत्तर महाराष्ट्र संपर्क प्रमुख सुरेश धनके, जि.प.अध्यक्षा रंजनाताई पाटील, माजी जि.प.सदस्य नंदकिशोर महाजन, कैलास सरोदे, बाजार समिती सभापती श्रीकांत महाजन, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष पद्माकर महाजन, पं.स. सदस्य जितेंद्र पाटील, उपसभापती जुम्मा तडवी, पं.स. सदस्य योगिता वानखेडे, कविता कोळी, धनश्री सावळे, शिवाजीराव पाटील, विजय धांडे, भाजपा तालुकाध्यक्ष राजन लासुरकर, माजी पं.स. उपसभापती सुनिल पाटील, प्रल्हाद पाटील, प्रा. सी.एस. पाटील आदी भाजपा पदाधिकारी लोकप्रतिनिधि उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2417063931920902/

Protected Content