Home धर्म-समाज राष्ट्रवादी महिला काँग्रेस पाठविणार १० हजार पत्रे ! (व्हिडिओ )

राष्ट्रवादी महिला काँग्रेस पाठविणार १० हजार पत्रे ! (व्हिडिओ )

0
24

 

जळगाव प्रतिनिधी । हाथरस प्रकरणाचा तपास जलदगतीने होऊन दोषींना फाशी व्हावी यासाठी राष्ट्रवादी जळगाव महिला आघाडी (ग्रामीण) १० हजार पत्रे पाठविणार असून आज याला प्रारंभ करण्यात आला.

काल झालेल्या उत्तर प्रदेशातील मनिषा हत्याकांडात पोलीसांकडून जबरदस्तीने पिडीतेवर अंत्यसंस्कार केले. या घटनेतून उत्तर प्रदेशातील महिलांच्या सुरक्षेसंदर्भातील भीषण अवस्था समोर आली असून योगी सरकारला व केंद्र शासनाला जाब विचारण्यासाठी राष्ट्रवादी महिला आघाडीने राज्यमरातून १०,००० पत्रे पाठवण्याचा निर्धार केला आहे. त्याप्रमाणे राष्ट्रवादी जळगाव महिला आघाडी (ग्रामीण) ह्यांनी केंद्र सरकारला जाब विचारला आहे. जिल्हा महिला अध्यक्ष कल्पना पाटील, सरचिटणीस अर्चना कदम, महानगर अध्यक्ष जयश्री पाटील, महानगर सरचिटणीस ममता तडवी, जिल्हा उपाध्यक्ष मीनाक्षी चव्हाण, जिल्हा सचिव शकुंतला धर्माधिकारी आदींनी प्रातिनिधिक स्वरूपात पंतप्रधान मोदी यांना पत्र लिहिले आहे.

 

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/2791388564517574

 


Protected Content

Play sound