Home Cities जळगाव भाग्यश्री नवटके यांची बदली; चंद्रकांत गवळी यांची नियुक्ती

भाग्यश्री नवटके यांची बदली; चंद्रकांत गवळी यांची नियुक्ती

0
107

जळगाव प्रतिनिधी । अपर पोलीस अधिक्षक भाग्यश्री नवटके यांची बदली झाली असून त्यांच्या जागी चंद्रकांत गवळी हे पदभार सांभाळणार आहेत.

पोलिस खात्यातील तब्बल १५० वरिष्ठ अधिकार्‍यांच्या बदल्या करण्यात आल्या असून त्यामध्ये ४३ आयपीएस अधिकार्‍यांचा समावेश आहे. महाराष्ट्र सरकारच्या गृह विभागाने बुधवारी रात्री आदेश जारी केले आहेत.

यात जळगावच्या अप्पर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके यांची पुणे शहर आर्थिक गुन्हे शाखेत बदली झाली. नंदुरबारचे एएसपी चंद्रकांत गवळी यांची जळगाव येथे अप्पर अधीक्षकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. अमळनेरचे उपविभागीय पोलिस अधिकारीपदी मुंबईचे राकेश जाधव यांची बदली झाली. तर, भुसावळचे गजानन राठोड यांची मुंबईला बदली झाली.


Protected Content

Play sound