Home राजकीय मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांचा शिवसेनेत प्रवेश

मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांचा शिवसेनेत प्रवेश


Sonawane

मुंबई (प्रतिनिधी) मनसेचे एकमेव आमदार शरद सोनावणे यांनी आज मनसेला जय महाराष्ट्र करत शिवसेनेत प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंच्या उपस्थितीत मनसेचे आमदार शरद सोनावणे यांनी हातावर शिवबंधन बांधले. दरम्यान, मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांना लोकसभा निवडणुकीच्या आधीच हा मोठा धक्का बसल्याचे मानले जात आहे.

२०१४ मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीत राज ठाकरेंच्या बुडत्या नौकेला शरद सोनावणे यांनी वाचवले होते. मात्र आता सोनावणे यांनी शिवसेनेचा झेंडा हातात घेतला आहे. त्यामुळे राज ठाकरेंसाठी हा धक्काच मानला जातो आहे. दरम्यान, दुसरीकडे जुन्नर तालुक्यातील शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी शरद सोनावणे यांच्या पक्षप्रवेशावर तीव्र विरोध दर्शवत आमची भूमिका ऐकून न घेता शरद सोनावणे यांना उमेदवारी दिली तर तालुक्यातील सर्व पदाधिकारी आपापल्या पदाचा सामूहिक राजीनामा देतील, असा इशाराही दिल्याची चर्चा होती.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here

Protected Content

Play sound