जळगाव प्रतिनिधी | जिल्हा पोलीस दलातील बदली प्रक्रिया सुरु करण्यात आली असून यासाठी पोलीस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे हे थेट संबंधितांना फोने करत आहेत.
पोलिस दलात पोलिस शिपाई ते सहाय्यक फौजदार या पदाच्या बदल्यांची प्रक्रिया सुरु झाली आहे. बदलीस पात्र असलेल्या कर्मचाऱ्यांनी दिलेल्या पर्यायात तेथे जागा रिक्त नसली तर पोलिस अधीक्षक थेट कर्मचाऱ्यांना फोन करून शेजारचे पोलिस ठाणे दिले तर चालेल का? अशी विचारणा करीत आहेत.
पोलिस अधीक्षक डॉ. प्रवीण मुंडे यांनी अपर पोलिस अधीक्षक भाग्यश्री नवटके व सहाय्यक पोलिस अधीक्षक यांना सोबत घेऊन कर्मचाऱ्यांनी भरून दिलेल्या अर्जाची छाननी करून त्यावर दिलेले पर्याय व तेथे असलेली परिस्थिती याचा अंदाज घेऊन नियुक्त्या दिल्या. पर्यायांपैकी जेथे जागा रिक्त नाही अशावेळी अर्जावरील मोबाइल क्रमांकावर संपर्क साधून थेट कर्मचाऱ्यांनाच शेजारचे पोलिस ठाणे किंवा इतर कुठे नियुक्ती द्यायची अशी विचारणा डॉ. मुंडे व भाग्यश्री नवटके यांच्याकडून केली जात आहे. या प्रकारची पारदर्शक प्रक्रिया पहिल्यांदाच राबवली जात आहे.