पाठलाग करून अवैध वाळूचे वाहन पकडले; महिला तलाठ्यांची कामगिरी

भुसावळ प्रतिनिधी । अवैध वाळूची वाहतूक करणार्‍या वाहनाचा थरारक पाठलाग करून साधना खुळे या तलाठ्यांनी हे वाहन पकडून त्याला २ लाख ४२ हजार रूपयांचा दंड ठोठावला आहे. या कामात लाईव्ह ट्रेंडस न्यूजचे प्रतिनिधी पत्रकार संतोष शेलोडे यांनी त्यांना मदत केली.

याबाबत वृत्त असे की, भुसावळ तालुक्यात चोरट्या मार्गाने अवैध रेती,गौण खनिज वाहतूक करणार्‍यांची मनमानी सुरू असून १७ सरोजी मा.उपविभागीय अधिकारी यांच्या दालनात तहसीलदार यांच्या उपस्थितीत रेती व गौण व खनिज वसुली बाबत मिटिंग घेण्यात आली असून पैसे न भरणार्‍यांवर सक्तीने कारवाई करण्याचे आदेश देण्यात आले आहे.

उपविभागीय अधिकारी रामसिंग सुलाने यांच्या आदेशावरून तहसीलदार दीपक धिवरे यांच्या मार्गदर्शनाखाली साधना खुळे (तलाठी शिंदी),मनीषा गायकवाड तलाठी साकरी,जयश्री पाटील तलाठी सुनसगाव या महिला तालाठ्यांचे पथक तयार करण्यात आले आहे. दिनांक १७ रोजी पथक नहाटा चौफुली अवैध रेती वाहतूक करणार्‍या वाहनावर कारवाई करण्यासाठी उभे असतांना दुपारी १२.३० वाजेच्या दरम्यान रेतीने भरलेली ट्रक साकेगाव वरून वरणगावं कडे जात असतांना पथकाने नहाटा चौफुली जवळ ट्रकला थांबविण्याचा प्रयत्न केला असता ट्रक चालक भरधाव वेगाने निघून गेला.

महिला तलाठ्यांच्या या पथकाने आपली वाहने काढून ट्रकचा पाठलाग करून रेतीचा भरलेला ट्रक यशोदा हॉटेल जवळ थांबविला. पथकातील शिंदी गावच्या तलाठी साधना खुळे यांनी ट्रक चालकास ट्रक तहसील कार्यालयात घेऊन जाण्यास सांगितले असता ट्रक चालक रमेश भरत परदेशी (राहणार साकेगाव) हा महिला तलाठी पाहून दंबगिरी करू लागला. त्याने सात ते आठ रेती माफियांना घटनास्थळी बोलावून दादागिरी करीत ट्रक यशोदा हॉटेल जवळून वळवून साकेगावकडे भरधाव वेगाने नेत असतांना पथक नहाटा चौफुली जवळ थांबले.

हा सर्व प्रकार पत्रकार संतोष शेलोडे बघत असतांना पथकांची भेट घेऊन पथकाला मागे येण्यास सांगितले.पत्रकार शेलोडे हे स्वतः मोटरसायकल घेऊन ट्रकचा पाठलाग करीत असतांना राजस्थान मार्बल जवळ ट्रकच्या समोर मोटरसायकल आडवी लावून हायवे वरील वाहतून थांबविल्याने ट्रक काही वेळेतच घटनास्थळी पथक दाखल झाले.

दरम्यान, रेतीचा भरलेला ट्रक पथकांच्या ताब्यात देऊन पत्रकार संतोष शेलोडे घटनास्थळावरून गेले असता पुन्हा ट्रक चालक ट्रक घेऊन पसार झाला.पुन्हा पथक रिकामे हाती तहसील कार्यालयामध्ये आले व सर्व प्रकार तहसीलदार यांना सांगितले असता नायब तहसीलदार शशिकांत इंगळे यांनी वरिष्ठांच्या आदेशावरून ट्रक चालकास संपर्क साधून ट्रक आणतो की पोलीस स्टेशनला गुन्हा दाखल करू असे म्हणतात ट्रक चालक रमेश भरत परदेशी हा एम.एच.१९ जे.०१५० क्रमांकाचा ट्रक रेती कुठे तरी खाली करून रिकामा घेऊन तहसील कार्यालयाच्या आवारात घेऊन आला.

याबाबत नायब तहसीलदार शशिकांत इंगळे यांनी ट्रक चालक रमेश भरत परदेशी राहणार साकेगाव यांना २ लाख ४१ हजार ३४८ रुपयांची नोटीस देऊन कारवाई केली आहे. तर रिकामा ट्रक तहसील कार्यालयाच्या आवारात लावण्यात आला आहे. खरच शिंदीचया महिला तलाठी साधना खुळे यांची कामगिरी कैतुकास्पद आहे. उपविभागीय अधिकारी यांनी दिलेल्या आदेशावरून ही नियमित कारवाई अशाच प्रकारे सुरू राहणार असून अवैध रेती,गौण खनिज चालक/मालकांवर कारवाईचे सत्र सुरू रहावे अशी अपेक्षा व्यक्त करण्यात आली आहे.

Protected Content