जळगाव प्रतिनिधी । जिल्ह्यातील जळगाव शहरात आज तब्बल १५० रूग्ण आढळून आले आहे. तर जिल्ह्यात आज एकूण ६६७ कोरोना बाधीत असल्याचे सायंकाळच्या रिपोर्टमधून समोर आले आहे.
आज सायंकाळी आलेल्या रिपोर्टमध्ये जिल्ह्यात ६६७ रूग्ण आढळून आले आहेत. गेल्या काही दिवसांपासून मोठ्या प्रमाणात कोरोना बाधीत आढळण्याचा ट्रेंड आजही कायम राहिल्याचे यातून अधोरेखीत झाले आहे. दरम्यान आज जळगाव शहरात आज तब्बल १५० रूग्ण तर जामनेर तालुक्यात ११२ रुग्ण आढळून आले आहेत.
तालुक्यातील आजची आकडेवारी
जळगाव शहर- १५० , जळगाव ग्रामीण-१६; भुसावळ-४०; अमळनेर-३२; चोपडा-६१; पाचोरा-२८; भडगाव-५; धरणगाव-४७; यावल-१८ ; एरंडोल-२९; जामनेर-११२; रावेर-१६; पारोळा-५४; चाळीसगाव-१९; मुक्ताईनगर-२९; बोदवड-६ आणि इतर जिल्ह्यातील ५ असे एकुण ६६७ रूग्ण आढळून आले आहेत.
जिल्ह्यात आतापर्यंत ३८ हजार ८३६ रूग्ण संख्या झाली असून त्यापैकी २७ हजार ७४९ रूग्ण बरे होवून घरी परतले आहे. आज ११ रूग्णांचा मृत्यू झाला असून जिल्ह्यात एकुण मृतांचा आकडा ९७१ वर पोहचला आहे. तर १० हजार ११६ रूग्ण कोवीड रूग्णालयात उपचार घेत आहे.