Home अर्थ कोरोनामुळे अमेरिकी अर्थव्यवस्था पांगळी

कोरोनामुळे अमेरिकी अर्थव्यवस्था पांगळी

0
65

वॉशिंग्टन वृत्तसंस्था । कोरोना व्हायरसमुळे निर्माण झालेल्या आर्थिक संकटात सर्व देशांच्या अर्थव्यवस्थांची अवस्था गंभीर झाली आहे. अशातच जगाच्या अर्थव्यवस्थेचे इंधन मानले जाणाऱ्या अमेरिकेच्या अर्थसंकल्पात वर्षाच्या पहिल्या ११ महिन्यात विक्रमी ३ हजार अब्ज डॉलर इतकी विक्रमी तूट झाली आहे. अमेरिकन सरकारला कोरोनाचा प्रभाव कमी करण्यासाठी मोठा खर्च करावा लागला. यामुळे अर्थ संकल्पावर परिणाम झाला आहे. त्या देशात लाखो लोकांच्या नोकऱ्या गेल्या आहेत. जगातील सर्वाधिक रुग्ण आणि मृत्यू अमेरिकेत झाले आहेत.

याआधी ११ महिन्याच्या कालावधीत अर्थसंकल्पात विक्रमी तूट २००९ मध्ये नोंदवली गेली होती. तेव्हाची तूट १ हजार ३७० अब्ज डॉलर इतकी होती. २००८मधील जागतिक आर्थिक संकटाचा तो काळ होता. पण अर्थसंकल्पातील सध्याची तूट ही याआधी पेक्षा दुप्पटीने अधिक आहे. अमेरिकेचे २०२०चे आर्थिक वर्ष ३० सप्टेंबर रोजी संपणार आहे. अमेरिकन काँग्रेसच्या बजेट कार्यालयानुसार पूर्ण आर्थिक वर्षातील तूट ३ हजार ३०० अब्ज डॉलवर जाऊ शकते.

ऑक्सपर्ड इकॉनॉमिस्टचे नॅसी वॅडन हुटन यांनी सांगितले की, सप्टेंबर महिन्यात ही तूट २०० अब्ज डॉलर असेल. ज्याने पूर्ण वर्षातील तूट ३.२ ट्रिलियन डॉलर इतकी होईल. ही गेल्या अर्थसंकल्पातील तूटीपेक्षा ९८४ अब्ज डॉलरने अधिक आहे.


Protected Content

Play sound