Home Cities मुक्ताईनगर ‘त्या’ व्हिडीओ क्लीप्स दाखविल्यास खळबळ उडेल : खडसेंचा सूचक इशारा

‘त्या’ व्हिडीओ क्लीप्स दाखविल्यास खळबळ उडेल : खडसेंचा सूचक इशारा

0
66

मुक्ताईनगर प्रतिनिधी । आपल्याकडे अनेक व्हिडीओ क्लीप्स असून त्या दाखविल्यास खळबळ उडेल असा सूचक इशारा आज माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी दिला. ते एबीपी-माझा या वाहिनीच्या विशेष कार्यक्रमात बोलत होते.

माजी मंत्री एकनाथराव खडसे यांनी अलीकडच्या काळात आपल्या पक्षांतर्गत विरोधकांवर जोरदार हल्लाबोल केला आहे. विशेष करून २ सप्टेंबर रोजी वाढदिवसाचा कार्यक्रम झाल्यापासून ते दररोज जोरदार टीकास्त्र सोडत आहेत. विशेष बाब म्हणजे ते आता थेट माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेऊन टीका करत आहेत. त्यांनी आज एबीपी-माझा या वृत्तवाहिनीच्या विशेष कार्यक्रमात तोफ डागली आहे.

यात ते म्हणाले की, ४० वर्षाच्या राजकीय जीवनात एकही आक्षेप माझ्यावर आला नाही, माझ्यावर जे आरोप केले ते विरोधकांनीही केले नाहीत, माझा राजीनामा विरोधकांनाही मागितला नाही. पक्षातंर्गत ज्या गोष्टी झाल्या त्यानंतर नैतिक पदावरुन राजीनामा दिला. नंतर सरकारच्या काळात खुद्द देवेंद्र फडणवीस यांच्यावरही एक्सिस बँकेबाबत आरोप झाला. पदाचा दुरुपयोग झाला असं म्हटलं मग मला एक न्याय आणि दुसर्‍याला वेगळा त्या वेदना आणि खंत माझ्या मनात नेहमी राहणार आहे. विनोद तावडे, पंकजा मुंडे, यासारख्या अनेक नेत्यांवर अनेक आरोप झाले. पण कोणाचेही राजीनामे घेतले नाहीत, माझ्यावर आरोप झाला आणि राजीनामाही घेतला हे मनाला वेदनादायी होतं.

दरम्यान, या कार्यक्रमात खडसे यांनी पुन्हा एकदा क्लीपचा विषय काढला. ते म्हणाले की, माझ्याकडे अनेक व्हिडीओ, कागदपत्रे आहेत ती समोर आली तर प्रचंड खळबळ उडेल. मी इतक्या खालची पातळीचं राजकारण करत नाही, वरिष्ठांना ते दाखवलं आहे. त्यांच्यासारखं मी चुका केल्या नाहीत, या व्यक्तिगत बाबी आहेत, मी पक्षाच्या वरिष्ठांसमोर हे मांडले आहे. वरिष्ठांकडून न्याय मिळाला नाही तर जनतेसमोर मांडेन.काहींच्या जीवनात बदल घडू शकतो. ज्यांच्यामुळे मला त्रास झाला त्यांच्याबद्दल दया असण्याचं कारण नाही. जे काही होईल जनतेसमोर येईल असा इशाराही एकनाथराव खडसे यांनी केला आहे.


Protected Content

Play sound