जळगाव प्रतिनिधी । कामाच्या निमित्ताने गावाला गेल्याचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री घरफोडी करून घरातील कपाटातून ५० हजार रूपयांची रोख रक्कम चोरून नेल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की, सारीका प्रल्हाद खरे (वय-३७) रा. तुळशीराम नगर, रामेश्वर कॉलनी हे भाड्याने राहतात. सारीका खरे यांच्या सासरी अहमदाबाद येथे श्राध्दचा कार्यक्रम असल्याने त्या गावाला गेल्या. तर मुलागा स्वप्निल हा खामगाव जि.बुलढाणा येथे मित्राकडे गेला. त्यावेळी त्यांनी घराला कुलूप लावून ०५ सप्टेंबर रोजी सायंकाळी ७ वाजता घरासमोर राहणाऱ्या अशाबाई पाटील यांच्याकडे घराची चाबी दिली होती. दरम्यान ८ सप्टेंबर रोजी घरात चोरी झाल्याचे शेजारी राहणारे अतुल पाटील यांनी फोनद्वारे कळविले. आज सकाळी ४ वाजता गावाहून घरी आल्यावर पाहिले असताना घराचे दोन्ही दरवाजे उघडे आणि कपाटातील ५० हजार रूपये रोख, एलसीडी टिव्ही आणि काही वस्तू असा एकुण ५५ हजार ३०० रूपयांचा मुद्देमाल चोरीस गेला आहे. सारीका खरे यांच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ महेंद्रसिंग पाटील, महेंद्र गायकवाड हे करीत आहे.