भडगाव (प्रतिनिधी)। भडगाव तहसिलदारपदी गणेश मरकड यांनी नुकताच पदभार स्वीकारला असून या निमित्ताने भारिप बहुजन महासंघ भडगाव शाखेतर्फे तहसिलदार यांचा शाल श्रीफळ व पुष्पगुच्छ देऊन सत्कार करण्यात आला. यावेळी तालुकाध्यक्ष आण्णा मोरे (पहिलवान), युवा तालुकाध्यक्ष बापू सोनवणे, शहराध्यक्ष अतुल सोनवणे, सम्राट वाघ, उमेश पाटील, दगडू सोनवणे, रवि सोनवणे, शरद अहिरे, सोनवणे, निकम, संजय त्रिबुवने यांच्यासह सर्व भारिप बहुजन महासंघाचे कार्यकर्ते उपस्थित होते.
भडगाव तहसीलदारांचा भारिप बहुजन महासंघातर्फे सत्कार
6 years ago
No Comments