भागपूर उपसा सिंचन प्रकल्पाचे ई भुमीपुजन ( व्हिडीओ )

पहूर (प्रतिनिधी) । भागपूर उपसा सिंचन प्रकल्प हा शेतकऱ्यांचे भाग्य बदलवणारा प्रकल्प असून यामुळे शेतीचे उत्पन्न वाढणार आहे. त्यामुळे शेतकरी आनंदी व श्रीमंत होणार आहे, असे प्रतिपादन पालकमंत्री ना.चंद्रकांत पाटील यांनी केले. भागपूर उपसा सिंचन योजना टप्पा २ या योजनेचे ई भुमीपुजन पालकमंत्री चंद्रकांत पाटील यांच्याहस्ते करण्यात आले. त्यावेळी ते बोलत होते. यावेळी जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांच्या हस्ते भुमीपुजन करून योजनेचा शुभारंभ करण्यात आला आहे. तापी पाटबंधारे विकास महामंडळ जळगाव, उपसा सिंचन बांधकाम विभाग जळगाव यांच्यावतीने या कार्यक्रमाचे आयोजन जामनेर रोडलगत शेतात पहूर येथे करण्यात आले होते.

कार्यक्रमास यांची होती उपस्थिती

यावेळी प्रमुख अतिथी म्हणून राज्य सहकार राज्यमंत्री ना.गुलाबराव पाटील, जि.प.अध्यक्षा ना.उज्वला पाटील, खासदार रक्षा खडसे, आमदार स्मिता वाघ, आमदार हरीभाऊ जावळे, आमदार संजय सावकारे, माजी मंत्री एम.के.पाटील, जि.प.उपाध्यक्ष नंदकिशोर महाजन, राज्याचे माहिती आयुक्त व्हि.डी.पाटील, भाजपा जिल्हा उपध्याक्ष गोविंद अग्रवाल, पहूर पेठचे सरंपच निता पाटील, सरंपच कसबे ज्योती घोंगडे, भाजपा तालुकाध्यक्ष चंद्रकांत बाविस्कर, पोलीस अधीक्षक पंजाबराव उगले, जि.प.महिला बालकल्याण सभापती रजनी चव्हाण, सभापती रूपाली पाटील, आमदार उन्मेष पाटील, तापी पाटबंधारे विभागाचे अधिक्षक अभियंता ए.एस.मोरे, कार्यकारी संचालक एस.डी.कुलकर्णी, जि.प.सदस्य अमित देशमुख, पुरोहित जयंत जोशी, माजी जि.प.सदस्य नामदेश्व टिेळेकर, राजधर पांढरे, माजी पं.स.सदस्य बाबुराव घोंगळे, साहेबराव देशमुख, अरविंद देशमुख, सरपंचपती रामेश्वर पाटील, उपसरपंच रविंद्र मोरे, समाधान पाटील, नवलसिंग पाटील, कमलाकर पाटील यांच्यासह जामनेर तालुक्यातील शासकिय अधिकारी, सरपंच, उपसरपंच, पदाधिकारी, कार्यकर्ते यांच्यासह ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते. प्रास्ताविक तापी पाटबांधारे कार्यकारी संचालक एस.डी. कुळकर्णी यांनी केले. सुत्रसंचालन प्रा. अपुर्वा वाणी यांनी तर आभार अरविंद देशमुख यांनी मानले.

यावेळी पुढे ना पाटील म्हणाले की, 2 हजार 300 कोटींचा हा महत्वकांक्षी प्रकल्प आहे. यामुळे दरवर्षी या जामनेर, पाचोरा व जळगाव तालुक्यातील शेतकऱ्यांचे दरवर्षी 660 कोटींचे उत्पन्न वाढणार आहे. जलयुक्त शिवाराच्या माध्यमातून 2015-16 या वर्षात पाऊस चांगला झाल्यामुळे राज्यातील शेतकऱ्यांचे उत्पन्न 40 हजार कोटीने वाढले आहे. शेतीचा विकासक २३ टक्केच्या पुढे गेला आहे. हे केवळ पाऊस चांगला झाल्याने जमिनीतील पाणीसाठा वाढतो. तो आपल्याला वापरला मिळाल्याने शेतीचे उत्पन्न वाढले आहे. आम्ही शेतकऱ्यांना आनंदी व श्रीमंत करणारे असून काँग्रेसच्या सरकारने फक्त शेतकऱ्यांना अशिक्षित व अडाणी ठेवण्याचे धोरण स्विकारल्याने त्यांच्या कार्यकाळात झाले, शेतीविकास दर वाढला नाही. ते आमच्या सरकारने करून दाखविले आहे. या प्रकल्पासाठी यासाठी जलसंपदा मंत्री ना.गिरीश महाजन यांचे श्रेय असून येथील प्रकल्प पूर्ण करणे हि त्यांची जबाबदारी आहे. असे स्तुती सुमने महाजनांवर पाटील यांनी उधळली.व अवघ्या पाच मिनीटात अध्यक्षीय भाषण उरकले.

तापी प्रकल्पाकडे लक्ष द्या – ना. गुलाबराव पाटील
आमची जबाबदारी तुमच्यावर आहे. तुमच्या कडे बजट आहे.मी खाली तिजोरीचा मंत्री आहे. शेवटी शेजारच्याचे महाजनांनी या प्रकल्पाच्या माध्यमातून माझ्या तालुक्यातील शेतकऱ्यांचा पाण्याचा प्रश्न मिटून भले केले आहे. असे सहकारराज्य मंत्री गुलाबराव पाटील यांनी उच्चारताच सभा स्थळी एकच हशा पिकला. शेतकऱ्यांना पाणी, रस्ते विज हे मिळाल्यास शेतकऱ्यांचे उत्पन्न वाढणार आहे यात शंका नाही. पण पाच तालुक्यांचा तापी प्रकल्प असलेल्या निम्न तापी प्रकल्पाला आपण निधीची तरतूद करून प्रकल्पाचे काम पूर्णत्वास नेण्याची अपेक्षा हि महाजनांकडून आहे असे ना. गुलाबराव पाटील म्हणाले.

पहा : भागपूर सिंचन प्रकल्पाच्या भूमिपुजन कार्यक्रमाचा व्हिडीओ.

Add Comment

Protected Content